आपण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गिय असाल व आपल्याला पुढील प्रवेशा साठी तसे दाखले तयार करायचे असतील तर आपण आपल्या उत्पन्नाचा हिशोब तयार ठेवायला हवा. मार्च महिना संपताच सरत्या वर्षी आपली कमाई किती झाली व त्यासाठी आपल्याला तसा दाखला कोठे मिळतो याची माहिती काढून ठेवावी व लागणारा अर्ज मार्च महिन्यातच आणुन ठेवावा.
आर्थिक वर्ष संपताच उत्पनाचा दाखला मिळण्यासाठी अर्ज करावा. कधि कधि दाखला मिळायला विलंब होतो. एप्रिल मध्येच अर्ज केला तर मे शेवटपर्यंत दाखला आपल्या हातात असतॊ व ऎनवेळेचा त्रास वाचतो.
दाखला तयार नसल्यास आपल्याला पूर्ण फि भरावी लागते व उगाच भूर्दंड पडतो त्यामूळे आवश्यक काळजी घ्यायलाच हवी.
एक अत्यंत गरीब मुलगा एकदा माझ्याकडे आला. मुलगा फार हूशार होता व त्याला बारावीत फार चांगले गुण होते. पण उत्पनाचा दाखला वेळेवर न मिळाल्याने त्याला एका खुप चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळूनही घेता आला नाही कारण त्याला उत्प्न्नाचा दाखला नसल्याने पूर्ण फि भरावी लागणार होती व ती त्याच्या आवाक्यात नव्हती. त्यामूले त्याचे एक वर्ष उगाच वाया गेले. पुढल्या वर्षी त्याने सर्व दाखले तयार ठेवले व त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला.
अशी वेळ आपल्यावर येवू नये याची काळजी घ्यावी.