गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

दाखले.

बारावी नंतर जर आपल्याला BA, B.Com वा B.Sc. ला जायचे असेल तर आपल्याला अर्ज करताना खालील दाखले तयार ठेवावे लागतील.

१. दहावीची गुणपत्रिका.

२. बारावीची गुणपत्रिका.

३. शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला.

४. जातीचा दाखला. (आपण कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेऊ ईच्छित असाल तर)

५. आपल्या उत्पनाचा दाखला. (आपण अल्प उत्पन्न गटात येत असाल तर)

वरिल दाखले प्रवेश अर्जा सोबत जोडावे लागतात. तसेच प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेताना मूळ प्रत सोबत ठेवावी, ती आपल्याला महाविद्यालयात जमा करावी लागेल.

मूळ प्रत महाविद्यालयात जमा करतांना खालील काळजी घ्यावी.

१. महाविद्यालयात दाखले जमा केल्याचे त्या प्राचार्यांचे पत्र घ्यावे.

२. ज्या महाविद्यालयात आपण मूळ प्रत जमा केली आहे त्याच महाविद्यालयाच्या प्राचार्यां कडून काही प्रती साक्षांकित करुन घ्याव्या. असे केल्याने आपल्याला जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर कोणतीही अडचण येणार नाही व नविन दाखले तयार करुन घ्यायचे असल्यास त्रास होणार नाही.

BA, B. Com व B.Sc. ला प्रवेश घेताना याशिवाय कोण्तेही दाखले लागत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा