शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

राष्ट्रीयतेचा दाखला : Nationality Certificate.

राष्ट्रीयतेचा दाखला (Nationality Certificate) : व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारा एक अतिशय महत्वाचा कागद.
आपला जन्म भारतातच झाला असेल व भारताशिवाय कोणताही देश बघितलेला नसेल तरीही हा दाखला लागतोच. जसे आपण कुठे गेलात तर आपल्याला आपले ओळखपत्र सोबत बाळगायचे असते.
याचे कारण या सर्व जागा फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठीच राखीव असतात. या दाखल्यासोबतच आपल्याला रहिवासाचा दाखला (Domicile Certificate) व जन्मतारखेचा दाखला पण मिळतो.
या जागा महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे रहिवासाचा दाखला पण हवा असतो.
हे दाखले कुठे मिळतात ?
आपण यासाठी तहसिलदार वा जिल्हाधिकारी कार्यालयात एक अर्ज करायचा व साधारण एका आठवड्यात आपल्याला हा दाखला मिळतो.
अर्ज करताना सोबत खालील पुरावे सोबत न्यावे.
१. जन्म तारखेचा व ठिकाणाचा पुरावा.
२. विद्यार्थ्याच्या आई किंवा वडिलांचा रहिवासाचा दाखला.
३. रेशन कार्ड.
व वरिल सर्व कागद पत्रांच्या साक्षांकित प्रती.
अर्ज भरताना कुठेही खाडाखोड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तर चला गर्दी वाढण्यापुर्वीच हा दाखला तयार करुन घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा