शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश.

या अगोदरच्या लेखात आपण बघितल कि BA, B. Com व B.Sc. सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना कोणकोणते दाखले लागतात.
या पुढे आपण व्यावसायिक अभ्यासक्रमांना (अभियांत्रिकी, वैद्यकिय इत्यादी) लागणारे दाखले कोणते ते बघूया.
१. दहावीची गुणपत्रिका. (SSC Marksheet)
२. बारावीची गुणपत्रिका. (HSC Marksheet)
३. शाळा / कॉलेज सोडल्याचा दाखला. (School / College Leaving Certificate)
४. राष्ट्रीयत्वाचा दाखला. (Nationality Certificate)
५. जातीचा दाखला. (Caste Certificate)
६. जात पडताळणीचा दाखला. (Caste Validity Certificate)
७. उत्पन्नाचा दाखला. (Income Certificate)
८. नॉन क्रिमी लेयर सर्टिफीकेट. (Non-Creamy Layer Certificate)
९. रहिवासाचा दाखला. (Domicile Certificate)
यापैकी क्रमांक १ ते ४ सर्वांना आवश्यक आहे तर त्यापुढील दाखले काही विशिष्ठ विद्यार्थ्यांनाच लागतात.
या पुढे आपण प्रत्येक दाखला का लागतो व कुठे मिळतो या बद्दल बघूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा